Ad will apear here
Next
कुडाळ शहर होतेय ‘स्मार्ट’
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते भिंत रंगवून कुडाळ शहर सुशोभीकरणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.कुडाळ : शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी कुडाळवासीय एकवटले आहेत. कुडाळमधील चौदा संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘स्मार्ट कुडाळ फोरम’च्या माध्यमातून शहर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत कुडाळ ग्रामीण रुग्णालयाची संरक्षक भिंत ‘स्वच्छ आणि सुंदर कुडाळ’ अशी संकल्पना घेऊन रंगवण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी, सात मे रोजी झाला.

समस्त कुडाळवासीय एकत्र आले, की काय करू शकतात हे त्यांनी गेल्या वर्षी भंगसाळ नदी गाळमुक्त करून दाखवून दिले आहे. आता कुडाळवासीय शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी एकत्र आले आहेत. ‘स्मार्ट कुडाळ फोरम’च्या माध्यमातून कुडाळ शहराच्या सुशोभीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. कुडाळ शहरातील विविध १४ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी ‘स्मार्ट कुडाळ फोरम’मध्ये कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब, लायन्स क्लब, डॉक्टर्स क्लब, केमिस्ट असोसिएशन, पत्रकार संघ, ध्येय प्रतिष्ठान, स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा संस्थांचे प्रतिनिधी आहेत.

कुडाळ कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात आले असून, कुडाळ नगरपंचायतीच्या सहकार्याने आणि अमेरिकास्थित डॉ. अनिल नेरुरकर, देव वडके, मनोहर बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ ग्रामीण रुग्णालयासमोरील संरक्षक भिंत ‘स्वच्छ आणि सुंदर कुडाळ’ अशी थीम घेऊन रंगवण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ रविवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांच्या हस्ते भिंत रंगवून झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्ष विनायक राणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, देवानंद ढेकळे, सुनील सौदागर, अमित सामंत, गजानन कांदळगावकर, केदार सामंत आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांच्यासहित उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

आठ दिवसांत भिंत रंगवणार
ही भिंत रंगवण्याचे काम कुडाळची ‘ओरिगो डिझाइन स्टुडिओ’ ही संस्था करत आहे. पंकज, घोगळे, दत्ताराम पवार, हर्षद कुडतरकर, अमेय धुरी, यामेश खवणेकर आणि साईश वाडकर हे कलाकार आठ दिवसांत ही भिंत रंगवून पूर्ण करणार आहेत. या भिंतीवर स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणारे विविध प्रकारचे संदेश रंगवले जाणार आहेत.

अशा प्रकारची चित्रे भिंतीवर रंगवली जाणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZTIBC
Similar Posts
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
निराधारांना ‘जीवन आनंद’ देणारा संविता आश्रम जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीतील माया
कोकमांवर होतेय डॉक्युमेंट्री कुडाळ : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकम फळांची ख्याती आता जगभर पोहोचणार आहे. कोकमांना नुकतेच भौगोलिक निर्देशन (जिऑग्राफिकल इंडिकेशन – जीआय) मिळाले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्पेनमधील एक पथक सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकमांबद्दलची डॉक्युमेंटरी तयार करत आहे. त्यामुळे कोकणी कोकमांचा
सिंधुदुर्गात लोकनृत्याचा आविष्कार कुडाळ : दशावतारी नाटकांसह साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक हिऱ्यांची खाण समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रसिक सध्या वेगवेगळ्या राज्यांतील लोकनृत्यांचा आस्वाद घेत आहेत. केंद्र सरकारचे पश्चिमी क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोकमहोत्सवाला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language